मॅकबुक प्रो आता अधिक वेगवान प्रोसेसरसह येणार

0
मॅकबुक प्रो, मॅकबुक प्रो-2018, macbook pro 2018

अ‍ॅपलने आपले मॅकबुक प्रो या लॅपटॉप्सला आता अधिक वेगवान प्रोसेससरसह सादर केले असून भारतातही याला उपलब्ध करण्यात आले आहे.

जगभरात मॅकबुक प्रो या मालिकेतील लॅपटॉप्स मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. भारतातही याला लाँच करण्यात आले असून ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. अ‍ॅपलने आता हे मॉडेल्स नवीन स्वरूपात सादर करण्याची घोषणा केली आहे. याच्या अंतर्गत १३ आणि १५ इंची मॅकबुक प्रो हे मॉडेल्स भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आले आहे. यामध्ये इंटेलचे आठव्या पिढीतील अत्यंत गतीमान असे कोअर आय-५ आणि कोअर आय-७ हे प्रोसेसर्स देण्यात आले आहेत.

२०१६ साली पहिल्यांदा मॅकबुक प्रो लाँच करण्यात आले होते. २०१७ मध्ये याला अपडेट करण्यात आले होते. तेव्हा यामध्ये इंटेलचा कॅबे लेक हा प्रोसेसर देण्यात आला होता. तर आता २०१८ मध्ये लाँच करण्यात आलेल्या मॉडेल्समध्ये इंटेलचेच आठव्या पिढीतील गतीमान प्रोसेसर प्रदान करण्यात आले आहेत. याच्यामुळे या लॅपटॉप्सवरून विविध फंक्शन्सचा उपयोग हा प्रचंड गतीने करण्यात येणार असल्याचा दावा अ‍ॅपल कंपनीने केला आहे. विशेष करून उच्च ग्राफीक्सयुक्त कंटेंटचा वापर करण्यासाठी हे नवीन मॉडेल्स उपयुक्त ठरणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. यातील १३ इंची मॉडेलच्या विविध व्हेरियंटचे मूल्य १.४९ लाख तर १५ इंची मॉडेल्सच्या व्हेरियंटचे मूल्य १.९९ लाख रूपयांपासून सुरू होणारे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here