मोटो ई ३ पॉवरची घोषणा

0

मोटोरोला कंपनीने मोटो ई३ पॉवर या नव्या स्मार्टफोनची घोषणा केली असून हे मॉडेल लवकरच भारतात उपलब्ध होणार आहे.

मोटो ई ३ पॉवर हा किफायतशीर दरातला स्मार्टफोन आहे. याची रॅम दोन जीबी इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. हे मॉडेल अँड्रॉईडच्या मार्शमॅलो आवृत्तीवर चालणारे असून यात ३५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. एलईडी फ्लॅशसह यात ८ मेगापिक्सल्सचा मुख्य तर सेल्फीसाठी ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. मोटो ई ३ पॉवर हा स्मार्टफोन १.० गेगाहर्टझ क्वॉड-कोअर मीडियाटेक एमटी ६७३५ प्रोसेसरने सज्ज आहे. यात फोर-जी नेटवर्क सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. हे मॉडेल पहिल्यांदा हॉंगकॉंगमध्ये लॉंच करण्यात आले असून ते लवकरच भारतातही सादर करण्यात येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here