मोबाईल क्रमांकच बनणार आयडी आणि पासवर्ड

0

ट्विटरने डीजिट नावाने नवीन सुविधा दिली असून या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकालाच लॉगीन आयडी आणि पासवर्ड म्हणून वापरणे शक्य होणार आहे.

digits-sign1

वेब आणि स्मार्टफोन ऍप्ससाठी आपल्याला असंख्या वेळेस लॉगीन करावे लागते. यासाठी आयडी आणि पासवर्ड लक्षात ठेवणे आवश्यक असते. आता मात्र ट्विटरने यावर तोडगा शोधला आहे. यासाठी ‘डीजिट’ या नावाने नवीन सुविधा प्रदान करण्यात आली आहे. या माध्यमातून आता लॉगीन आयडी आणि पासवर्डची आवश्यकता आता उरणार नाही. यासाठी फक्त आपला मोबाईल क्रमांकच वापरण्यात येईल. जगभरात सध्या निम्म्यापेक्षा जास्त लोकांकडे मोबाईल फोन आहे. यामुळे मोबाईल क्रमांक हीच संबंधीत व्यक्तीची आयडेंटीटी बनविण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्वाचे पाऊल मानले जात आहे.

विशेष बाब म्हणजे आपल्याकडे ट्विटरचे अकाऊंट नसले तरीही या सुविधेचा लाभ मिळणार आहे. फक्त यासाठी ङ्गडीजिटफच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला मोबाईल क्रमांकासह साईनअप करावे लागले. संबंधीत मोबाईलवर पाठविण्यात आलेला संकेतांक टाकल्यानंतर ही प्रक्रिया पुर्ण होईल. यानंतर या सुविधेचा लाभ मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here