या स्मार्टफोनच्या डिस्प्लेवरच आहे फिंगरप्रिंट स्कॅनर !

0

गेल्या अनेक महिन्यांपासून उत्सुकता लागून असणारे ‘ऑन स्क्रीन’ फिंगरप्रिंट स्कॅनर हे फिचर अखेर डोगी या कंपनीने आपल्या स्मार्टफोनमध्ये प्रदान केले आहे.

सध्या बहुतांश मध्यम आणि उच्च श्रेणीतल्या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर हा अविभाज्य घटक बनला आहे. तर काही कंपन्यांनी किफायतशीर दरातील मॉडेल्समध्येही हे फिचर दिले आहे. स्मार्टफोन अनलॉक करण्यासाठी याचा वापर केला जातो. आजवर स्मार्टफोनच्या मागील बाजूस अथवा समोर डिस्प्लेच्या खाली फिंगरप्रिंट सेन्सर दिलेले असते. अलीकडच्या काळात मात्र काही कंपन्यांनी डिस्प्लेवरच ही सुविधा देण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती समोर आली होती. यात अ‍ॅपल, सॅमसंग, विवो आदी कंपन्या प्रकारचे फिचर असणारा स्मार्टफोन लाँच करणार असल्याचे मानले जात होते. तथापि, या सर्व कंपन्यांना मागे टाकत डोगी या चीनी कंपनीने बाजी मारली आहे. या कंपनीने डोगी व्ही (Doogee V) या नावाने नवीन स्मार्टफोन सादर केला असून यात ऑन स्क्रीन या प्रकारातील फिंगरप्रिंट स्कॅनर प्रदान करण्यात आले आहे.

डोगी व्ही या मॉडेलमध्ये ६.२ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. यावरच खालील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा देण्यात आली आहे. यात ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. मात्र या कॅमेर्‍यांसह अन्य फिचर्स माहिती कंपनीतर्फे जाहीर करण्यात आलेली नाही. लास व्हेगास शहरात सुरू होणार्‍या ‘सीईएस-२०१८’ या टेकफेस्टमध्ये याचे अधिकृत अनावरण करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here