युट्युबवर आता ‘ब्लर’ इफेक्ट

0

युट्युब या व्हिडीओ शेअरिंग साईटने आपल्या युजर्सने अपलोड केलेल्या व्हिडीओतील हवा तो भाग पुसट (ब्लर) करण्याची सुविधा प्रदान केली आहे.

आपण अनेकदा दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांमध्ये ‘ब्लर इफेक्ट’ पाहत असतो. साधारणपणे एखाद्या व्यक्तीची वा स्थळाची ओळख गुप्त ठेवण्यासाठी याचा वापर करण्यात येतो. युट्युबवर २०१२ पासून एखाद्या व्यक्तीचा चेहरा ‘ब्लर’ करण्याची सुविधा होती. मात्र व्हिडीओच्या हव्या त्या भागाला पुसट करण्याचे फिचर प्रदान करण्यात आले नव्हते. बहुतांश अद्ययावरत व्हिडीओ एडिटिंग सॉप्टवेअरमध्ये ही सुविधा असते. मात्र यासाठी प्रशिक्षित कौशल्य आवश्यक असते. यामुळे कामचलावू व्हिडीओ एडिटींग करणार्‍यांना हा ‘इफेक्ट’ जमत नसल्याने युट्युबवर हे फिचर असावे अशी अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत होती. या पार्श्‍वभुमिवर आता युट्युबने हे फिचर सादर करण्याची घोषणा केली आहे.

ही सुविधा मिळविण्यासाठी आपल्याला ब्लरींग इफेक्ट टॅबवर क्लिक करावे लागेल. यात कस्टम ब्लरींग आणि यानंतर एडिट या पर्यायावर क्लिक करावे. यानंतर आपल्याला हव्या असणार्‍या भागावरून कर्सर फिरवून ब्लर करावे. याला रिसाईज करून याची टाईमलाईन निश्‍चित करावी. अर्थात किती वेळापर्यंत संबंधीत भाग पुसट दिसेल? हे यातून निश्‍चीत होणार आहे. संबंधीत भागाची हालचाल ‘लॉक’ करणेही यात शक्य आहे. आपल्याला हवे असल्यास एकाच व्हिडीओतील अनेक भाग पुसट करण्याची सुविधादेखील यात देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here