युट्युबसमोर फेसबुकचे आव्हान

0
youtube vs facebook

व्हिडीओ शेअरींगमध्ये युट्युब आघाडीवर असले तरी फेसबुक हे संकेतस्थळ झपाट्याने या प्रकारात लोकप्रिय होत असून ते युट्युबसमोर आव्हान उभे करण्याची शक्यता आता वर्तविण्यात आली आहे.

youtube vs facebook

युट्युब हे संकेतस्थळ व्हिडीओ शेअरिंग करण्यात आघाडीवर आहे. प्रत्येक क्षणाला या साईटवर हजारो तासांचे व्हिडीओ अपलोड होत असतात. अनेक वेबसाईटने युट्युबला आव्हान देण्याचा प्रयत्न केला तरी यात कुणाला यश आले नाही. आता मात्र युट्युबला समान प्रणालीवर आधारित वेबसाईटपासून नव्हे तर फेसबुकपासून धोका असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सोशल मीडियाचा अत्यंत बारकाईने अभ्यास करणार्‍या ‘सोशलबँकर्स’ या संस्थेने आपल्या ताज्या अहवालात फेसबुक ही साईट व्हिडीओ शेअरिंगचे लोकप्रिय साधन बनत असल्याची माहिती दिली आहे. यासाठी त्यांनी २० हजार फेसबुक पेजेसचा एक वर्षापर्यंत अभ्यास केला. यातून त्यांना वापरकर्ते आता युट्युबवर व्हिडीओ अपलोड करून त्याची लिंक शेअर करण्याऐवजी थेट फेसबुकच्या इनबिल्ट सुविधेचा वापर करून व्हिडीओ अपलोड आणि शेअर करत असल्याचे आढळून आले. फेसबुकची ही सुविधा वापरकर्त्यांसाठी अत्यंत सोयीची असल्याने ते यांना प्राधान्य देत आहेत. यामुळे येत्या काही वर्षांमध्ये युट्युबसमोर फेसबुक हे संकेतस्थळ मोठे आव्हान उभे करण्याची शक्यता या संस्थेने वर्तविली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here