युट्युब आणणार ‘म्युझिक की’ सेवा

0

गुगलच्या मालकीच्या युट्युब या संकेतस्थळावर आता मासिक वर्गणीच्या माध्यमातून ‘म्युझिक की’ ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

youtube streaming
ऑनलाईन व्हिडीओजच्या क्षेत्रात युट्युब अग्रेसर आहे. या वेबसाईटवर दरमहा तब्बल सहा अब्ज तास इतक्या कालावधीचे व्हिडीओज पाहिले जातात. मात्र त्या तुलनेत जाहिराती येत नसल्याने गुगल यावर कधीपासूनच विचार करत आहे. या अनुषंगाने आता दरमहा ९.९९ डॉलर्स (सुमारे सहाशे रूपये) इतक्या वर्गणीत वापरकर्त्याला युट्युब या साईटवरील कंटेंटचा जाहीरातविना आस्वाद घेता येणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यासाठी युट्युब आणि गुगल म्युझिक प्ले या दोन्ही सेवा एकत्र करण्यात येणार आहेत. गुगलकडे सध्या तब्बल दोन कोटी गाण्यांचे अजस्त्र भंडार आहे. यात अनेक लाईव्ह कॉन्सर्टस्चाही समावेश आहे. या सर्वांना संबंधीत सेवेच्या माध्यमातून ऍक्सेस मिळणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे ऑफलाईन असतांनाही या सेवेचा लाभ मिळणार आहे.

गेल्या वर्षापासूनच युट्युब प्रिमियम सेवा सुरू करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र अद्यापही ही सेवा सुरू करण्यात आलेली नसतांनाच आता ‘म्युझिक की’ या नावाने ही सेवा लवकरच लॉंच करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. मात्र ही सेवा युट्युब नव्हे तर नव्या डोमेनवर सुरू करण्याची माहिती समोर आली आहे. यामुळे युट्युब हे विद्यमान स्वरूपात कायम ठेवून नवीन सेवा अस्तित्वान येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here