युट्युब डेस्कटॉपवर पीक्चर इन पीक्चर मोड

0

युट्युब या व्हिडीओ शेअरिंग साईटने आपल्या डेस्कटॉप युजर्ससाठी पीआयपी अर्थात पीक्चर इन पिक्चर मोड हे विशेष फिचर देण्याचे संकेत दिले आहेत.

युट्युब साईटने आपल्या अँड्रॉइड व आयओएस युजर्ससाठी आधीच पीआपी हे फिचर दिले आहे. याच्या अंतर्गत कुणीही युजर एखादा व्हिडीओ पाहत असतांनाही साईटवरील अन्य कंटेंट सर्च करू शकतो. आता डेस्कटॉपवरून युट्युब वापरणार्‍यांनाही ही सुविधा मिळणार आहे. यामुळे आता युजर एखादा व्हिडीओ पाहत असतांना युट्युब साईटवर अन्य बाबी सर्च करू शकतो. दरम्यान, आधीपासून सुरू असणारा व्हिडीओ हा एका फ्लोटींग विंडोमध्ये सुरू राहील. या माध्यमातून युजर्सची एंगेजमेंट वाढणार असल्याचे मानले जात आहे. डेस्कटॉपवरून युट्युब वापरणार्‍या काही युजर्सला हे फिचर दिसू लागले असून लवकरच सर्व युजर्सला हे सादर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात युट्युब रेड या प्रिमीयम सेवेच्या सबस्क्रायबर्सला याची सुविधा मिळणार असून नंतर याला इतरांसाठी सादर करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here