युट्युब व्हिडीओतील बॅकग्राऊंड बदलता येणार

0

युट्युब या व्हिडीओ शेअरिंग साईटने आता आपल्या युजर्सला कोणत्याही व्हिडीओचा पार्श्‍वभाग बदलण्याची सुविधा प्रदान करणारे फिचर प्रदान केले आहे.

व्हिडीओ एडिटींगमध्ये बॅकग्राऊंड बदलण्याची सुविधा दिलेली असते. मात्र यासाठी उच्च तांत्रिक कौशल्याची आवश्यकता असते. अर्थात व्हिडीओ संपादनासाठी विकसित करण्यात आलेल्या विविध सॉफ्टवेअर्समध्ये याची सुविधा दिलेली असते. मात्र हे काम बरेचसे किचकट आहे. याला सुलभ करण्यासाठी अलीकडच्या काळात पार्श्‍वभाग बदलण्यासाठी संबंधीत व्हिडीओचे चित्रीकरण करतांना याच्या मागील बाजूस हिरव्या रंगाचा पडदा लावतात. नंतर क्रोमा की इफेक्टच्या मदतीने मागील बाजूला हवे ते बॅकग्राऊंड टाकता येते. अर्थात ही प्रक्रियादेखील थोडी किचकट आहे. मात्र युट्युब या साईटने आपल्या युजर्ससाठी याच प्रकारचे अर्थात कोणत्याही व्हिडीओचा पार्श्‍वभाग बदलण्याची सुविधा देणार्‍या रिअल टाईम व्हिडीओ सेगमेंटेशन या फिचरची घोषणा एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून केली आहे.

युट्युब साईटने या फिचरसाठी आर्टीफिशियल इंटिलेजियन्स आणि मशीन लर्नींग या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. याचा वापर करून कुणीही आपल्या व्हिडीओचे बॅकग्राऊंड बदलू शकतो. यासाठी युजर्सला विविध पर्याय देण्यात येणार आहेत. हे फिचर पहिल्या टप्प्यात मोबाईल युजर्सला देण्यात आले आहे. अर्थात अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालीचे युजर्स याचा वापर करू शकतील. नंतर याला डेस्कटॉपच्या युजर्ससाठी सादर करण्यात येईल असे मानले जात आहे. युट्युब या साईटने स्टोरीज हे फिचर प्रयोगात्मक अवस्थेत दिले आहे. यासाठी रिअल टाईम व्हिडीओ सेगमेंटेशन हे फिचर अतिशय उपयुक्त ठरू शकते.

खालील अ‍ॅनिमेशनमध्ये रिअल टाईम व्हिडीओ सेगमेंटेशन या फिचरची कार्यप्रणाली दर्शविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here