रेनो डस्टरची सँडस्टॉर्म आवृत्ती

0

रेनो कंपनीने आपल्या डस्टर या मॉडेलची सँडस्टॉर्म ही आवृत्ती दोन व्हेरियंटमध्ये भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

रेनो डस्टरच्या या ८५पीएस आणि ११०पीएस या व्हेरियंटचे दिल्लीतील एक्स-शोरूम मूल्य अनुक्रमे १०.९ आणि ११.७ लाख रूपये असून ते ब्राँझ, सिल्व्हर आणि स्लेट ग्रीन या तीन रंगांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. रेनो डस्टरच्या सँडस्टॉर्म या आवृत्तीत काही अंतर्गत आणि बाह्य बदल करण्यात आले आहेत. बाह्य बदलांचा विचार केला असता, यात अतिशय आकर्षक असे ग्राफीक असेल. यात इलेक्ट्रॉनिक पध्दतीने अ‍ॅडजस्ट होणारे आरसे, नवीन लँप, १६ इंची झोडियाक अलॉय व्हिल्स देण्यात आले आहेत. याच्या बाह्य भागात स्टँडस्टॉर्मचे बोधचिन्ह असेल. आतील भागातही चांगल्या दर्जाची आसन व्यवस्था देण्यात आली असून येथेही बोधचिन्ह देण्यात आले आहे. तर रेनो डस्टरच्या या आवृत्तीत सात इंच आकारमानाचा टचस्क्रीन असणारी इन्फोटनमेंट प्रणाली देण्यात आली आहे. याला स्मार्टफोन कनेक्ट करता येणार असून याच्या मदतीने संगीतासह अन्य मनोरंजनाच्या आनंदासह दिशादर्शनही कळणार आहे. तर सुरक्षेसाठी यात ड्युअल एयरबॅग्ज असतील.

रेनो डस्टरच्या सँडस्टॉर्म या आवृत्तीत १.५ लीटर के९के डीसीआय म्हणजेच कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन या प्रकारातील इंजिन देण्यात आले असून ते दोन्ही व्हेरियंटसाठी अनुक्रमे ५ व ६ मॅन्युअल स्पीड गिअर्सला संलग्न करण्यात आले आहे. तर या दोन्ही व्हेरियंटचे मायलेज हे २० किलोमीटर प्रति-लिटर इतके असेल. रेनो डस्टर सँडस्टॉर्म या आवृत्तीची देशभरातील रेनो कंपनीच्या शोरूममधून अगावू नोंदणी सुरू करण्यात आली आहे. तसेच रेनो कंपनीच्या अ‍ॅपवरही याच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here