रॉयल एनफिल्डची शानदार हिमालयन

0

रॉयल एनफिल्ड या कंपनीने हिमालयन ही आपली बहुप्रतिक्षित अॅडव्हेंचर बाईक भारतात लॉंच केली आहे.

रॉयल एनफिल्ट ही जगातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही कंपनी हिमालयन ही अॅडव्हेंचर बाईक लॉंच करणार असल्याने याबाबत प्रचंड कुतुहलाचे वातावरण होते. अखेर ही बाईक भारतात दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. नावाप्रमाणेच ही बाईक अत्यंत रफ-टफ वापरासाठी आहे. डोंगर-दर्‍यांमधून हिंडणार्‍या साहसी प्रवाशांना डोळ्यासमोर ठेवून या मॉडेलची निर्मिती करण्यात आली आहे. अर्थात यात अशा स्वरूपाच्या प्रवासासाठी आवश्यक असणार्‍या सर्व साधनांना ठेवण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात १५ लीटरचे पेट्रोल टाकी देण्यात आली असून याच्या मदतीने सुमारे ४५० किलोमीटरपर्यंत प्रवास करणे शक्य आहे. यात अत्यंत शक्तीशाली असे एलएस ४१० हे इंजिन देण्यात आले आहे. लांबवरच्या प्रवासातही थकू नये म्हणून यात अत्यंत उत्तम दर्जाचे मोनो शॉक रिअर सस्पेन्शन लावण्यात आले आहेत. ही बाईक ऑईल न बदलता तब्बल दहा हजार किलामीटर अंतरापर्यंतचा प्रवास सहजगत्या करू शकते. हे मॉडेल स्नो आणि ग्रॅनाईट या दोन आकर्षक रंगांमध्ये मिळणार आहे. १.५५ लाख रूपये (एक्स-शोरूम मुल्य) या किंमतीपासून ही बाईक भारतात मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here