रॉयल एनफिल्डच्या थंडरबर्ड एक्सचे आगमन

0

रॉयल एनफिल्ड कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपली थंडरबर्ड एक्स ही दुचाकी दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्याची घोषणा केली आहे.

रॉयल एनफिल्डची थंडरबर्ड एक्स ही बाईक ३५० आणि ५०० सीसी क्षमतेच्या दोन पर्यायांमध्ये ग्राहकांना १.५७ आणि १.९९ लाख रूपयांमध्ये (दिल्लीतील एक्स-शोरूम मूल्य) उपलब्ध करण्यात आली आहे. यातील पहिले व्हेरियंट लाल आणि पांढर्‍यात तर दुसरे निळा आणि नारंगी या रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे. या सिटी क्रूझर या प्रकारातील दुचाकी आहेत. रॉयल एनफिल्डच्या थंडरबर्ड या मूळ आवृत्तीपेक्षा यात अनेक बदल करण्यात आले आहेत. यातील मुख्य बदल हा रंगांमध्ये दिसून येत आहे. आधी नमूद केल्यानुसार यात विविध रंगांचे पर्याय आहेत. तर या व्हेरियंटच्या खालील बाजूस मॅट ब्लॅक हा रंग प्रदान करण्यात आला आहे. मूळ आवृत्तीतली आसन व्यवस्था ही ‘स्प्लीट’ या प्रकारातील असली तरी मात्र या नवीन दुचाकीत एकसंघ आसन व्यवस्था असेल. तसेच याला एकंदरीत थोडा स्पोर्टी लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

रॉयल एनफिल्डच्या थंडरबर्ड एक्स या दुचाकीमध्ये ८ स्पोकने युक्त असणारे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. तर यात टेलीस्कोपीक फोर्क, उत्तम दर्जाचे सस्पेन्शन्स, दोन्ही चाकांसाठी डिस्क ब्रेक आदी अन्य फिचर्स देण्यात आले आहेत. तर या दुचाकींच्या दोन्ही व्हेरियंटमध्ये अनुक्रमे ३५० आणि ५०० सीसी क्षमतांचे इंजिन प्रदान करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here