लवकरच भारतात मिळणार शाओमीचा रेडमी नोट ६ प्रो

0
शाओमी रेडमी नोट ६ प्रो, xiaomi redmi note 6 pro

शाओमीचा रेडमी नोट ६ प्रो हा स्मार्टफोन लवकरच भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात येणार असून कंपनीने याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली आहे.

शाओमीने सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस रेडमी नोट ६ प्रो या मॉडेलचे अनावरण केेले होते. आता याला थायलंडमध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहे. तर येत्या काही दिवसांमध्ये हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शाओमी कंपनी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात याला लाँच करणार असल्याची माहिती समोर आलेली असल्याने आता याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. हा स्मार्टफोन याआधी बाजारपेठेत असणार्‍या रेडमी नोट ५ प्रो या मॉडेलची ही पुढील आवृत्ती आहे. यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स आहेत. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे याच्या पुढे आणि मागे ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. अर्थात यामध्ये एकूण चार कॅमेरे दिलेले आहेत. याच्या अंतर्गत मागील बाजूस १२ आणि ५ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे दिलेले आहेत. यातील ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा हा ड्युअल पिक्सल या प्रकारातील असून यामध्ये ऑटो-फोकस, एआय पोर्ट्रेट २.० आदी फिचर्स दिलेले आहेत. तर याच्या पुढील बाजूस २० आणि २ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आलेले आहेत. याच्याच मदतीने फेस अनलॉक हे फिचर कार्यान्वित करण्यात आलेले आहे. यामध्ये ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारा असून यावर एमआययुआय युजर इंटरफेस देण्यात आलेला आहे.

शाओमी रेडमी नोट ६ प्रो या मॉडेलमध्ये ६.२६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा फुल स्क्रीन पॅनल डिस्प्ले दिलेला आहे. याच्या वरील भागात नॉच देण्यात आलेला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १९:९ असा असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण देण्यात आलेले आहे. यात क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ६३६ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ३/४ जीबी व इनबिल्ट स्टोअरेज ३२/६४ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here