लवकरच युट्युबची पेड म्युझिक सेवा

0
youtube

युट्युब या व्हिडीओ शेअरिंग साईटवर लवकरच पेड म्युझिक सेवा सुरू होणार असून या माध्यमातून अ‍ॅपल म्युझिक आणि स्पॉटीफाय सारख्यांना तगडे आव्हान मिळणार आहे.

युट्युबवरील बहुतांश कंटेंट हे मोफत असले तरी यावरील एक भाग हा प्रिमीयम अर्थात पेड या प्रकारातील आहे. तर दुसरीकडे संगीताचा विचार केला असता गुगलने २०११ साली गुगल प्ले म्युझिकच्या अंतर्गत पेड सेवा सुरू केली होती. याला भारतातही सादर करण्यात आले आहे. तसेच युट्युबवर आधीच म्युझिक की आणि युट्युब रेड या नावांनी प्रिमीयम सेवा सादर करण्यात आल्या आहेत. यात आता नवीन पेड सेवेची भर पडणार आहे. याला प्रयोगात्मक अवस्थेत रिमिक्स हे नाव देण्यात आले आहे. यासाठी युट्युबने वॉर्नर ब्रदर्स, युनिव्हर्सल स्टुडिओ म्युझिक गु्रप आणि सोनी म्युझिक एंटरटेनमेंट आदी विख्यात कंपन्यांशी बोलीणीदेखील सुरू आहे.

युट्युबची रिमिक्स ही पेड सेवा नेमकी कशी असेल? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नसली तरी अ‍ॅपल म्युझिक आणि स्पॉटीफाय आदींपेक्षा ती भिन्न असेल असे मानले जात आहे. यात ऑन-डिमांड म्युझिकसह व्हिडीओ क्लिप्सचाही समावेश असेल. यासाठी युट्युबने विविध बँड आणि आर्टीस्टसोबतही सहकार्याची बोलणी सुरू केली आहे. युट्युबची ही नवीन सेवा अ‍ॅपल म्युझिक आणि स्पॉटीफाय यांना आव्हान उभे करण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here