लवकरच येणार युट्युब ओरिजीनल्स !

0
युट्युब ओरिजीनल्स-नेटफ्लिक्स व अमेझॉन प्राईमला टक्कर;

युट्युब या व्हिडीओ शेअरिंग साईटने भारतीय ग्राहकांसाठी युट्युब ओरिजीनल्स ही प्रिमीयम श्रेणीतील ‘व्हिडीओ ऑन डिमांड’ सेवा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

भारतात लवकरच युट्युब ओरिजीनल्स सेवा सुरू करण्यात येणार असल्याची चर्चा गत काही दिवसांपासून सुरू होती. युट्युबने याला आता अधिकृतपणे दुजोरा दिला असून येत्या काही दिवसांमध्ये याला अधिकृतपणे लाँच करण्यात येणार आहे. यासाठी युट्युबने दिग्गज संगीतकार ए.आर. रहेमानसोबत करार केलेला आहे. रहेमानच्या ‘एआररिव्हाईव्हड’ या कार्यक्रमाला युट्युब ओरिजीनल्समध्ये सर्वात पहिल्यांदा सादर करण्यात येणार असल्याचेही आता स्पष्ट झालेले आहे. हा ‘म्युझिक टॅलेंट शो’ असून याचा सूत्रधारही रहेमानच असणार आहे. युट्युब ओरिजीनल्सला पहिल्यांदा जाहिरातींनी युक्त कंटेंटच्या स्वरूपात सर्व युजर्सला मोफत उपलब्ध केले जाणार आहे. तथापि, याला लवकरच प्रिमीयम सेवेत परिवर्तीत करण्यात येणार आहे.

युट्युबवर जगभरातील कोट्यवधी युजर्स हे व्हिडीओ अपलोड करत असतात. यात अनेक एंटरटेनमेंट कंपन्या, आर्टीस्ट, बँड आदींचाही समावेश आहे. अर्थात, हे सर्व कंटेंट हे युजर्सच्या माध्यमातून अपलोड झालेले असते. तथापि, युट्युब ओरिजीनल्सची संकल्पना थोडी वेगळी आहे. यामध्ये खुद्द युट्युबनेच निर्मित केलेले कार्यक्रम दाखविण्यात येणार आहे. यामध्ये सध्या ६० कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला असून येत्या काही महिन्यांमध्ये ५० नवीन मालिका यात दाखल होणार आहेत. तर खास भारतीयांसाठी विविध कार्यक्रमांची निर्मितीदेखील करण्यात येत आहे. याच्या अंतर्गत गौरव कपूर प्रस्तुत ‘ब्रेकफास्ट विथ चँपियन्स’ आणि विक्रम साठे यांच्या ‘व्हाट द डक’ या दोन क्रिकेटवर आधारित कार्यक्रमांच्या माध्यमातून युट्युब ओरिजीनल्सची भारतात चाचपणीदेखील करण्यात आलेली आहे. या दोन्ही मालिकांना मिळालेला प्रतिसाद पाहून युट्युबचा उत्साह दुणावला असून याच प्रकारातील अन्य कार्यक्रम लवकरच सादर करण्यात येणार आहेत. या सेवेच्या माध्यमातून नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि अमेझॉन प्राईम व्हिडीओ आदींसारख्या व्हिडीओ ऑन डिमांड सेवांना तगडे आव्हान उभे करण्याची युट्युबची रणनिती असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here