लाव्हाचे दोन किफायतशीर फोर-जी स्मार्टफोन

0
lava_a76

लाव्हा कंपनीने भारतात ए ७२ आणि ए ७६ हे किफायतशीर दरातील फोर-जी नेटवर्क कनेक्टिव्हिटी असणारे स्मार्टफोन अनुक्रमे ६,४९९ आणि ५,६९९ रूपयांना लाँच केले आहेत.

या दोन मॉडेलसोबत लाव्हा कंपनीने ए ८९ हा स्मार्टफोनही लवकरच लाँच करण्याचे संकेत दिले असून याचे मुल्य ५,९९९ रूपये इतके असणार आहे. ए ७२ आणि ए ८९ या दोन मॉडेलमध्ये पाच तर ए ७६ मध्ये ४.५ इंच आकारमानाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या तिन्ही मॉडेलमध्ये १.५ गेगाहर्टझ क्वॉड-कोअर प्रोसेसर देण्यात आला असून यांची रॅम एक जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी इतके आहे. मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने हे स्टोअरेज ३२ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. तिन्ही मॉडेल अँड्रॉईडच्या ५.१ लॉलिपॉप प्रणालीवर चालणारे असून ए ७२ आणि ए ८९ मध्ये लवकरच मार्शमॅलोचे अपडेट प्रदान करण्यात येणार असल्याचे कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे. तिन्ही मॉडेलमध्ये ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा मुख्य कॅमेरा आहे. ए ७२ मध्ये सेल्फीसाठी ५ मेगापिक्सल्सचा, ए ७६ मध्ये व्हिजीए क्षमतेचा तर ए ८९ मध्ये २ मेगापिक्सल्सचे फ्रंट कॅमेरे असणार आहेत. यात डिजीटल झुम, एचडीआर आणि फोटो टायमर ग्रिडचे फिचर्सदेखील आहेत.

लाव्हा ए ७२, ए ७६ आणि ए ८९ हे स्मार्टफोन अनुक्रमे २,५००, १,८५० आणि २,००० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटर्‍यांनी सज्ज आहेत. या तिघांमध्ये व्हिडीओ ‘पिक्चर-इन-पिक्चर’ अर्थात ‘पीआयपी’ फिचर आहे. याच्या मदतीने व्हिडीओ पाहतांनाही अ‍ॅप शोधणे शक्य आहे. याशिवाय यात स्मार्ट स्क्रीन जेस्चर, स्मार्ट म्युझिक फिचर प्रदान करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here