लाव्हा आयरिस एक्स वन सेल्फी @ ६,७७७

0

लाव्हा कंपनीने आपला सेल्फी छायाचित्रांसाठी स्पेशल असणारा एक्स वन सेल्फी स्मार्टफोन ६,७७७ रूपयांना भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे.

Lava-Iris-X12

लाव्हा आयरिस एक्स वन सेल्फी या स्मार्टफोनमध्ये ८५४*४८० पिक्सल्स क्षमतेचा ४.५ इंच आकाराचा आयएसपी डिस्प्ले असून यावर असाही ड्रॅगनटेल ग्लासचे आवरण लावण्यात आले आहे. १.३ गेगाहर्टझ क्वॉड-कोअर प्रोसेसरने सज्ज असणारा लाव्हा कंपनीच्या या मॉडेलची रॅम एक जीबी तर इंटरनल स्टोअरेज आठ जीबी असून ते मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. यात २००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे. याचा मुख्य कॅमेरा आठ तर सेल्फीसाठी पाच मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा देण्यात आला आहे. यातील समोरच्या बाजूस असणार्‍या कॅमेर्‍यात आपण पुरेसा उजेड नसतांनाही उत्तम दर्जाचे सेल्फी छायाचित्र काढू शकतो. लाव्हा आयरिस एक्स वन सेल्फी हा स्मार्टफोन ६,७७७ रूपयांना सादर करण्यात आला आहे. तो देशातील सर्व ऑनलाईन पोटेर्ल्ससह सर्व रिटेल स्टोअर्समध्ये मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here