लिंक्डइनवर लवकरच व्हिडीओ शेअरिंगची सुविधा

0
linkedin

लिंक्डइन या प्रोफेशनल नेटवर्कींग साईटने आपल्या युजर्ससाठी आता व्हिडीओ शेअर करण्याची सुविधा सादर करण्याची घोषणा केली आहे.

इंटरनेटचा वाढलेला वेग आणि अर्थातच स्वस्त स्मार्ट उपकरणांमध्ये जगभरात सध्या व्हिडीओ शेअरिंग मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. फेसबुक व व्हाटसअ‍ॅपवर याच्या लोकप्रियतेत झालेली वाढ आपण सर्व जण अनुभवत आहोत. या पार्श्‍वभूमिवर आता लिंक्डइन या प्रोफेशनल्समध्ये अत्यंत लोकप्रिय असणार्‍या संकेतस्थळानेही याच पध्दतीचे फिचर देण्याचे जाहीर केले आहे. अर्थात या साईटचा वापर करणारे युजर्स आता दहा मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ आपल्या खात्यावरून अपलोड करून शेअर करू शकतील. यासोबत व्हिडीओचे अ‍ॅनालिटीक टुलही प्रदान करण्यात आले आहे. यात व्हिडीओजच्या व्ह्यूजसह संबंधीत प्रेक्षकांच्या व्यावसायीक पार्श्‍वभूमिची माहितीदेखील मिळण्याची सुविधा असेल. याबाबत द नेक्स्ट वेब या टेक पोर्टलने सविस्तर वृत्त प्रकाशित केले आहे. येत्या काही दिवसांमध्ये सर्व युजर्सला हे फिचर प्रदान करण्यात येणार असल्याचे या वृत्तात लिंक्डइनच्या प्रवक्त्तयाच्या हवाल्याने नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here