‘लिंक्ड-इन’वर ई-लर्नींगची सुविधा

0
linkedin

लिंक्ड-इन या प्रोफेशनल सोशल नेटवर्कींग साईटवर आता विविध अभ्यासक्रमांसाठी ई-लर्नींगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

अलीकडेच मायक्रोसॉफ्ट कंपनीने लिंक्ड-इनला विकत घेतले आहे. यावर आता विविध नाविन्यपूर्ण सुविधा प्रदान करण्यात येत असून यात आता ई-लर्नींगचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी ‘लिंक्ड-इन लर्नींग’ हा खास भाग तयार करण्यात आला आहे. यावर कुणीही युजर आपल्याला हव्या त्या ऑनलाईन ट्युटोरिल्सचा लाभ घेऊ शकतो. यासाठी ‘लिंड्या.कॉम’ या ऑनलाईन शिक्षणातील अग्रेसर पोर्टलसोबत करार करण्यात आला आहे. याचसोबत युजर्सला आता लिंक्ड-इनवर मर्यादीत प्रमाणात कृत्रीम बुध्दीमत्तायुक्त ‘चॅटबॉट’चा वापर करता येणार आहे. तसेच या साईटवरील न्यूजफिडही अद्ययावत करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here