लेनोव्होचे मिनी वर्कस्टेशन

0

लेनोव्होने थिंकस्टेशन पी ३२० टिनी हे मिनी वर्कस्टेशन लाँच करण्याची घोषणा केली असून ते अ‍ॅपलच्या मॅकबुक एयर या मॉडेलप्रमाणेच वजनाने अतिशय हलके आहे.

थिंकस्टेशन पी ३२० टिनी या मॉडेलचे वजन अवघे १.३ किलोग्रॅम इतके आहे. यात इंटेलचा कोअर आय-७ हा अत्यंत गतीमान प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याच्या विविध व्हेरियंटमध्ये ३२ जीबीपर्यंत रॅम तर दोन टिबीपर्यंत स्टोअरेज देण्यात आले आहे. तर याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य ८०० डॉलर्सपासून (सुमारे ५१,७०० रूपये) सुरू होणारे आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात सहा युएसबी ३.० पोर्ट, चार मिनी डिस्प्ले तर दोन डिस्प्ले पोर्ट, एक इथरनेट पोर्ट, ड्युअल बँड वाय-फाय, ब्ल्यु-टुथ आदी फिचर्स देण्यात आले आहेत. हे मॉडेल विंडोज १०च्या प्रो आवृत्तीवर चालणारे असेल.

थिंकस्टेशन पी ३२० टिनी हे मॉडेल एकाच वेळी सहा डिस्प्लेंना सपोर्ट करणारे आहे. याच्या मदतीने विविध व्यवसायांशी संबंधीत प्रोजेक्टवर काम करणे शक्य आहे. यासाठी यामध्ये आयएसव्ही सर्टीफाईड सॉफ्टवेअर्स देण्यात आले असून यात ऑटो-कॅड, ऑटो डेस्क इन्व्हेंटर, ऑटो डेस्क रेव्हिट, बेंटले मायक्रो स्टेशन आदींसह इतर उपयुक्त टुल्सचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here