लेनोव्होच्या नवीन लॅपटॉपची घोषणा

0

लेनोव्होने पाच नवीन लॅपटॉप सादर केले असून यात आयडियापॅड, लिजन आणि फ्लॅक्स या मालिकांमधील मॉडेल्सचा समावेश आहे.

लेनोव्होने आयडियापॅड मालिकेतील ७२० एस, ३२० एस आणि ३२० हे तीन; लिजन वाय९२० तर फ्लेक्स ५ हे नवीन मॉडेल जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. यातील आयडियापॅड मालिकेत आधीच लाँच केलेल्या मॉडेल्सच्या सुधारित आवृत्त्या आहेत. लिजन वाय९२० हा गेमिंग तर फ्लेक्स ५ हा टु-इन-वन या प्रकारातील लॅपटॉप आहे.

आयडियापॅड ७२० एस आणि ३२० एस हे दोन्ही मॉडेल आधीपेक्षा स्लीम करण्यात आले आहेत. यातील ७२० एस या मॉडेलच्या विविध व्हेरियंटचे मूल्य ९६९.९९ डॉलर्सपासून सुरू होणारे आहे. यात १४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले तर इंटेलचा कोअर आय ७ प्रोसेसर असेल. याची रॅम १६ जीबी तर स्टोअरेज ५१२ जीबी इतके असेल. हे मॉडेल फक्त १५.९ मिलीमीटर इतके जाड आहे.यात एनव्हिडीओ जीफोर्स जीटी ९४०एमएक्स ग्राफीक कार्डही असेल. लेनोव्होचे आयडियापॅड ३२० एस हे मॉडेल १४ आणि १५ इंच आकारमानांच्या दोन व्हेरियंटमध्ये ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. यातही कोअर आय ७ प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. तर आयडियापॅड ३२० हे मॉडेल १५ आणि १७ इंच आकारमानाच्या दोन व्हेरियंटमध्ये ग्राहकांना खरेदी करता येईल.

लेनोव्होचे लिजन वाय ९२० हे मॉडेल व्हिआर-रेडी या प्रकारातील प्रो-लेव्हल गेमिंग लॅपटॉप आहे. यात १७ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले, कोअर आय ७ चा के मालिकेतील प्रोसेसर, एनव्हिडीया जीफोर्स जीटीएक्स १०७० ग्राफीक कार्ड आदी फिचर्स असून यासोबत आरजीबी कि-बोर्ड देण्यात आला आहे. पुढील महिन्यापासून याचे विविध व्हेरियंट ग्राहकांना २६९९.९९ डॉलर्स इतक्या मूल्यापासून खरेदी करता येतील. तर लेनोव्हो फ्लेक्स ५ हा टु-इन-वन लॅपटॉप १४ आणि १५ इंच आकारमानाच्या दोन व्हेरियंटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे. यात फोर-के युएचडी आयपीएस डिस्प्ले असेल. याशिवाय यातही कोअर आय ७ प्रोसेसर, एनव्हिडीया जीफोस ९४० एमएक्स ग्राफी कार्ड आदी फिचर्स असतील. हे मॉडेल पुढील महिन्यात ग्राहकांना खरेदी करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here