विनाचालक ट्रकची यशस्वी चाचणी

0

जगभरात विनाचालक कारबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असतांनाच आता डायमलेर व मर्सडिझ-बेंझ यांनी संयुक्तरित्या याच स्वरूपातील ट्रकची यशस्वी चाचणी घेतली आहे.
डायमलेर या कंपनीच्या स्मार्ट ट्रकमध्ये अत्यंत शक्तीशाली सेन्सर्स, कॅमेरे, रडार आणि स्वयंचलीत यंत्रणा लावण्यात आलेली आहे. याच्या मदतीने हा ट्रक अगदी गजबजलेल्या रस्त्यावरूनही सहजगत्या फिरू शकतो. हा ट्रक डायरमेर आणि मर्सडिझ-बेंझ यांनी संयुक्तरित्या तयार केला आहे. मर्सडिझच्या ‘हायवे पायलट’ या तंत्रज्ञानाने युक्त असणार्‍या या ट्रकला ‘ऍक्ट्रोस’ हे नाव दिलेले आहे.

जर्मनीतील ऑटोबोन या शहरातील गजबजलेल्या रस्त्यावर सुमारे १४ किलोमीटरचा प्रवास केला आहे. या यशस्वी चाचणीमुळे येत्या काही महिन्यांमध्ये वाहकाविना चालणारे ट्रक रस्त्यावर दिसल्यास नवल वाटता कामा नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here