विवो या चिनी कंपनीने ओटीजी आणि फोर-जी सपोर्ट असणारा वाय ५१ एल हे नवीन मॉडेल भारतात ११,९८० रूपयांना लॉंच केले आहे.
विवो वाय ५१ एल हे २०१६ मधील कंपनीचे पहिले मॉडेल ठरले आहे. यात ५ इंच आकारमानाचा आणि ५४० बाय ९६० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४१० प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम दोन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी इतके असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. यात एलईडी फ्लॅशसह ८ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतेचे दोन कॅमेरे आहेत. याच्या मदतीने फुल एचडी क्षमतेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याची सुविधा दिलेली आहे. यात फेस ब्युटी मोड, पॅनोरामा, एचडीआर आणि नाईट मोड आदी फिचर्स आहेत.
अँड्रॉईडच्या लॉलिपॉप प्रणालीवर आधारित फनटच २.५ या ऑपरेटींग प्रणालीवर विवो वाय ५१ एल हा स्मार्टफोन चालतो. यात २३५० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यात फोर-जी आणि थ्री-जी नेटवर्क सपोर्टसह वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस, युएसबी-ओटीजी, मायक्रो-युएसबी २.०, हेडसेट जॅक आदी फिचर्स दिलेले आहेत.