वेमो कंपनीतर्फे स्वयंचलीत ट्रकची चाचणी

0

अल्फाबेटची उपकंपनी असणार्‍या वेमो कंपनीने आता वाहकाविना चालणार्‍या ट्रकची चाचणी सुरू केली आहे.

अल्फाबेटने (पूर्वाश्रमीची गुगल कंपनी) वाहकाविना चालणार्‍या कारला विकसित करणार्‍या शाखेचे वेमो असे नामकरण केले आहे. या कंपनीच्या अंतर्गत स्वयंचलीत वाहनांचे विविध प्रयोग सुरू आहेत. आजवर या कंपनीतफे स्वयंचलीत कार विकसित करण्यात आली असून याची गजबजलेल्या रस्त्यांवर लक्षावधी किलोमीटर्सची चाचणी घेण्यात आली आहे. याबाबत संबंधीत कंपनीतर्फे वेळोवेळी माहितीदेखील देण्यात येत असते. या पार्श्‍वभूमिवर आता वेमो कंपनी वाहकाविना चालणार्‍या ट्रकची चाचणी घेत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत बझफिड या टेक पोर्टलने वृत्त प्रकाशित केले आहे. बझफिडला वेमो कंपनी स्वयंचलीत ट्रकची चाचणी घेत असल्याची माहिती एका छायाचित्राच्या माध्यमातून समजली. याबाबत विचारणा केली असता वेमो कंपनीने आपण अशा प्रकारच्या ट्रकची चाचणी घेत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तथापि, यासाठी केलेली गुंतवणूक आणि याबाबत केव्हा अधिकृत घोषणा होईल? याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही.

गुगलची (वेमोच्या माध्यमातून!) ड्रायव्हरलेस कार कोणत्याही क्षणाला व्यावसायिकरित्या सादर होईल अशी स्थिती आहे. या पार्श्‍वभूमिवर वेमो ड्रायव्हरलेस ट्रकची घेत असलेली चाचणी ही महत्वाची मानली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here