व्हाटसअ‍ॅपवरील ‘डिलीट फॉर एव्हरीवन’च्या मर्यादेत वाढ

0
whatsapp,व्हाटसअ‍ॅप

व्हाटसअ‍ॅपने आता वैयक्तीक चॅट तसेच ग्रुपमधील मॅसेज डिलीट करण्यासाठी दिलेल्या ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ या फिचरसाठी आता युजर्सला तब्बल ४,०९६ सेकंद म्हणजेच ६८ मिनिटे व १६ सेकंदाची वाढीव कालमर्यादा दिली आहे.

फेसबुकने अलीकडेच ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ हे फिचर आपल्या युजर्सला दिले होते. अनेकदा आपण चुकीने एखाद्या व्यक्तीला अथवा ग्रुपमध्ये अनावश्यक मॅसेट टाकत असतो. यामुळे आपल्याला लज्जास्पद स्थितीला सामोरे जावे लागते. नेमकी हीच बाब लक्षात घेत व्हाटसअ‍ॅपने हे फिचर दिले आहे. ‘डीलट फॉर एव्हरीवन’ हे फिचर टेक्स्ट मॅसेजसह प्रतिमा, व्हिडीओ, जीआयएफ, फाईल्स, लोकेशन शेअरिंग, स्टेटस रिप्लाईज व इमोजींसाठी वापरता येतेे. एखादा संदेश पाठविल्यानंतर सात मिनिटांच्या आत तो डीलीट करण्याची सुविधा या फिचरच्या माध्यमातून देण्यात आली होती. तथापि, आता या सात मिनिटांच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.

व्हाटसअ‍ॅपची अँड्रॉइड प्रणालीसाठी असणारी व्ही२.१८.६९ ही ताजी बीटा आवृत्ती युजर्सला सादर करण्यात आली आहे. यात युजर्सला त्याने वैयक्तीक अथवा सामूहिक म्हणजेच ग्रुपमध्ये पाठविलेला संदेश पाठविण्यासाठी तब्बल ४,०९६ सेकंदाची (६८ मिनिटे व १६ सेकंद) मर्यादा देण्यात आली आहे. व्हाटसअ‍ॅपची बीटा आवृत्ती वापरणार्‍यांना ही सुविधा मिळाली असून सर्व युजर्ससाठी याला लवकरच लागू करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here