व्हाटसअ‍ॅपवर टू-स्टेप-व्हेरिफिकेशन कसे कराल ?

0

व्हाटसअ‍ॅपने आता सर्व युजर्सला बहुप्रतिक्षित टू-स्टेप-व्हेरिफिकेशन प्रणाली लागू करण्याची घोषणा केली आहे. ही पध्दत नेमकी काय? हे सुलभ भाषेत जाणून घेऊया !

व्हाटसअ‍ॅप गेल्या अनेक महिन्यांपासून टू-स्टेप-व्हेरिफिकेशन प्रणालीची चाचणी घेत आहे. यात दोन टप्प्यांचे सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे. बीटा युजर्सला हे फिचर आधीच दिलेले असून आता सर्व युजर्सला ते मिळणार आहे. हे फिचर कार्यान्वित करण्यासाठी आपल्याला व्हाटसअ‍ॅपवरील सेटींगमध्ये जात अकाऊंटवर क्लिक करावे लागेल. या विभागात आपल्याला टू-स्टेप-व्हेरिफिकेशन’ हा पर्याय दिसेल. याच्या खाली असलेल्या ‘इनॅबल’वर क्लिक करून आपण या सुरक्षा प्रणालीचा वापर करू शकतात. यात पहिल्यांदा आपल्याला सहा आकडी ‘पासवर्ड’ निवडावा लागेल. यानंतर आपला ई-मेल मागण्यात येईल. ही स्टेट आपण ‘स्कीप’ करू शकतात. मात्र ई-मेलची माहिती खूप महत्वपूर्ण असून आपण जर पासवर्ड विसरले तर या ई-मेलच्या लिंकवरूनच आपण पासवर्ड ‘रिसेट’ करू शकणार असल्याचे ई-मेलची माहिती अवश्य भरावी. या माध्यमातून व्हाटसअ‍ॅपचा अत्यंत सुरक्षित वापर करता येणार आहे. मात्र यातील एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा. समजा आपण या टू-स्टेप-व्हेरिफिकेशन प्रणालीतला पासवर्ड विसरले आहात. आणि नंतर आपण तो ई-मेलच्या माध्यमातून रिकव्हर करण्याचा प्रयत्नदेखील केला नसल्यास आपण सात दिवसांपर्यंत आपल्या मोबाईलवर व्हाटसअ‍ॅपला ‘रिव्हेरिफाय’ करून वापरू शकणार नाहीत. सात दिवसानंतर मात्र पासवर्डशिवाय आपण व्हाटसअ‍ॅप वापरू शकाल. तथापि आपले तोवरचे सर्व मॅसेजेस डिलीट होतील. तसेच आपण पासवर्ड रिकव्हर न करता ३० दिवसानंतर व्हाटसअ‍ॅप वापरू शकणार नाही. कारण तेव्हा ते अकाऊंटच डिलीट झालेले असेल. या अटी काहीशा जाचक आहेत. मात्र सुरक्षेच्यादृष्टीने त्या अत्यंत महत्वपूर्ण असल्याने प्रत्येक युजरने टू-स्टेप-व्हेरिफिकेशन करून घ्यावे असे तज्ज्ञांचे मत आहे.

खालील व्हिडीओत ही प्रक्रिया दर्शविलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here