व्हिडीओ स्ट्रीमिंगसाठी ट्रायची लवकरच नियमावली

0

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्राय लवकरच ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवांसाठी स्वतंत्र नियमावली सादर करणार असल्याचे वृत्त आहे.

भारतात ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवा हळूहळू लोकप्रिय होत आहे. विशेष करून अत्यंत किफायतशीर दरांचे स्मार्टफोन्स आणि अत्यल्प दरांच्या डाटा प्लॅन्समुळे व्हिडीओ स्ट्रीमिंगला चांगले दिवस आले आहेत. सध्या या क्षेत्रात नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि हॉटस्टार यांच्या सेवा आघाडीवर आहेत. याशिवाय, युप टिव्ही आणि हुकसारख्या कंपन्यांनाही चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे. मात्र यात काही कंपन्या नियमांचा भंग करत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहे. विशेष करून कंटेंटबाबत ही तक्रार करण्यात येत आहे. अर्थात डीटीएच प्लॅटफॉर्मवर जे कंटेंट पेड स्वरूपात सादर केले जाते तेच व्हिडीओ स्ट्रीमिंगवर मोफत पहायला मिळत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. या तक्रारींची दखल घेत, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रीमिंगसाठी नियमावली करण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. याच्या अंतर्गत ओव्हर द टॉप (ओटीटी) व्हिडीओ स्ट्रीमिंग करणार्‍या कंपन्यांवर नियंत्रणासाठी नियमावली तयार करण्याचे काम सुरू आहे.

ट्रायने व्हाटसअ‍ॅप, व्हायबर व हाईकसारख्या मॅसेंजर्सवरून करण्यात येणार्‍या कॉलींगसाठी नियंत्रणात्मक नियमावली तयार करत असून यातच व्हिडीओ स्ट्रीमिंगचा समावेश होण्याची शक्यतादेखील आहे. याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here