संगणक उत्पादनात अ‍ॅपलची झेप

0

अ‍ॅपल कंपनीचा संगणक उत्पादनात जागतिक पातळीवर त्यांचा चौथा क्रमांक असल्याचे ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

अ‍ॅपल म्हटले की आपल्यासमोर आयफोनचे उत्पादन करणारी कंपनी उभी राहते. त्यात सत्यदेखील आहे. मात्र आयफोनसोबत अन्य उपकरणांमध्येही अ‍ॅपल अग्रेसर आहे. संगणकाचा विचार केला असता गार्टनर आणि आयडीसी या दोन ख्यातप्राप्त संस्थांच्या अहवालात अ‍ॅपल कंपनी चौथ्या क्रमांकावर असल्याचे दिसून आले आहे. या दोन्ही संस्थांनी २०१७ या वर्षात जागतिक पातळीवर विकण्यात आलेल्या पीसींची आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार गत वर्षात अ‍ॅपलने सुमारे दोन कोटी इतके संगणक विकले आहेत. आकडेवारीचा विचार केला असता अ‍ॅपल कंपनी संगणक उत्पादनात चौथ्या क्रमांकावर असल्याचे यातून अधोरेखित झाले आहे. याआधी एचपी, लेनोव्हो आणि डेल या कंपन्यांचा क्रमांक आहे.

मुळातच संगणकाच्या विक्रीत जगभरात घट होत आहे. या पार्श्‍वभूमिवर अ‍ॅपलच्या मॅक या मालिकेतील संगणकांना मिळालेली पसंती कंपनीसाठी तशी दिलासादायक आहे. अर्थात पहिल्या तीन कंपन्या आणि अ‍ॅपल कंपनीच्या संगणकांच्या विक्रीतील अंतर खूप असून स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या कंपनीला प्रचंड जिकरीचे असल्याचेही अधोरेखित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here