सुझुकी गिक्सर एबीएस दुचाकी दाखल

0

सुझुकी मोटारसायकल इंडिया या कंपनीने आपल्या गिक्सर या बाईकची एबीएस या प्रणालीने सज्ज असणारी आवृत्ती भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

आधीच सुझुकी गिक्सर एफएक्स या मॉडेलमध्ये सिंगल चॅनल अँटी लॉक ब्रेकींग प्रणाली देण्यात आलेली आहे. नेमक्या याच फिचरने सज्ज असणारे सुझुकी गिक्सर एबीएस-२०१८ हे मॉडेल बाजारपेठेत उतारण्यात आले आहे. याचे दिल्लीतील एक्स-शोरूम मूल्य ८७,२५० रूपये इतके आहे. हा अपवाद वगळता यातील बहुतांश फिचर्स हे मूळ मॉडेलप्रमाणेच आहेत. अर्थात यामध्ये १५४.९ सीसी क्षमतेचे सिंगल सिलींडर, फोर-स्ट्रोक इंजिन देण्यात आले असून याला ५-स्पीड गिअरबॉक्सशी संलग्न करण्यात आले आहे. याच्या पुढील बाजूस टेलीस्कोपीक फॉर्क तर मागे मोनोशॉक या प्रकारातील सस्पेन्शन असतील. उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, यामध्ये ऑटो हेडलँप ऑन म्हणजेच एएचओ या प्रकारातील हेडलाईट, एलईडी टेललँप्स, डिजीटल स्पीडोमीटर, ३-स्पोक लाईट व्हिल्स आदींचा समावेश असेल.

सुझुकी गिक्सर एबीएस-२०१८ हे मॉडेल मेटॅलिक ट्रिटॉन ब्ल्यू/ग्लास स्पार्कल ब्लॅक, कँडी सानोमा रेड/मेटॅलिक सोनीक सिल्व्हर आणि ग्लास स्पार्कल ब्लॅक या आकर्षक रंगाच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here