सुपर स्मार्ट मायक्रोसॉफ्ट सरफेस हब

0

मायक्रोसॉफ्टने अतिशय उच्च श्रेणीचे फिचर्स असणारे सरफेस हब ही संगणकांची मालिका सादर केली आहे. अत्यंत महागडे असणारे हे संगणक सामूहिक कामांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.

surface_hub

कधी काळी मायक्रोसॉफ्ट ही कंपनी फक्त सॉफ्टवेअर्सवर लक्ष केंद्रीत करत होती. खरं तर हार्डवेअरकडे या कंपनीने साफ दुर्लक्ष केले होते. मात्र अलीकडच्या काही वर्षांपासून मायक्रोसॉफ्टने जाणीवपुर्वक याकडे लक्ष देण्यास प्रारंभ केला आहे. संगणकांचा विचार करता सरफेस या मालिकेला जगभरातून उत्तम प्रतिसाद लाभला आहे. आता याच मालिकेतील सरफेस हब हे सुपर स्मार्ट संगणक सादर करण्यात आले आहे.

मायक्रोसॉफ्ट सरफेस हब हे ग्रुप वर्कींगसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे. यात तब्बल ८४ इंच आकारमानाचा टच स्क्रीन तसेच फोर के क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर कुणीही व्हिडीओ कॉलिंग, रिअल-टाईम कोलॅबरेशन, प्रेझेंटेशन, कलेक्टिव्ह वर्क आदी करू शकते. अनेक लोक यावर एकाच वेळी काम करू शकतात. यात मायक्रोसॉफ्टची विंडोज-टेन ही ऑपरेटींग प्रणाली आहे. यात मायक्रोसॉफ्टचे ऑफिस ऍप्स, स्काईप फॉर बिझनेस, वननोट आदी ऍप्लीकेशन्स देण्यात आलेली आहेत. तसेच यात कुणीही अन्य ऍप्लीकेशन्स/सॉफ्टवेअर्स टाकून काम करू शकतात. यात स्काईपचा उपयोग करण्यासाठी १०८० पिक्सल्स अर्थात फुल एचडी क्षमतेचे दोन वेबकॅम देण्यात आलेले आहेत.

मायक्रोसॉफ्ट सरफेस हबचा वापर हा अगदी सुलभ आहे. कुणीही स्क्रीनवरील ऍप्लीकेशनला प्रत्यक्ष स्पर्श करून त्याला ऍक्टीव्हेट करू शकतो. याशिवाय दुर खुर्चीवर बसून कुणीही व्हॉईस कमांड देऊ शकतो. याचसोबत विंडोज प्रणाली असणारा स्मार्टफोन, टॅब वा लॅपटॉपवरूनही याला आज्ञावली देता येते. अर्थात हे संगणक इतरांच्या तुलनेत महागडे आहेत. यातील ८४ इंच आकारमानाचा डिस्प्ले असणारा सरफेस हब हा तब्बल २० हजार डॉलर्स तर ५५ इंच आकारमानाचा ७ हजार डॉलर्सला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here