सॅमसंगने भारतात आपल्या ‘जे’ मालिकेतील जे टू हा फोर-जी कनेक्टिव्हिटी असणारा स्मार्टफोन लॉंच करण्याची आज घोषणा केली आहे.
भारतात किफायतशीर दरात फोर-जी स्मार्टफोन सादर करण्याकडे बहुतांश कंपन्यांचा कल आहे. या पार्श्वभुमिवर जे टू हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे. यात ४.७ इंच आकारमानाा क्युएचडी क्षमतेचा अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात १.३ गेगाहर्टझ क्वॉड-कोअर प्रोसेसर देण्यात आलाय. यात फोर-जी, थ्री-जी, जीपीएस, वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, वाय-फाय डायरेक्ट, युएसबी २.० आदी कनेक्टीव्हिटींचे पर्याय दिलेले आहेत. तर याची बॅटरी २००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे.
सॅमसंगचा हा स्मार्टफोन एक जीबी रॅम आणि आठ जीबी इनबिल्ट स्टोअरेजने सज्ज आहे. हे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. हा स्मार्टफोन ८४९० रूपयांना सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अल्ट्रा डाटा सेव्हिंग मोड या नव्या फिचरने सज्ज आहे. याच्या मदतीने फोर-जीच्या गतीने इंटरनेटचा वापर करतांनाही डाटा तुलनेत कमी लागतो. याशिवाय रॅम ११ टक्के अधिक मोकळी राहते. परिणामी हा स्मार्टफोन फोर-जी युजर्सला वापरण्यासाठी अत्यंत उपयुक्त राहणार असल्याचा दावा सॅमसंग कंपनीतर्फे करण्यात आला आहे.