सॅमसंगचा सेप्टी ट्रक

0

सॅमसंग या टेक्नॉलॉजीतल्या आघाडीवर असणार्‍या कंपनीने समोरच्या बाजूची वाहतूक मागील वाहनांना दिसण्याची सुविधा असणारा ट्रक विकसित केला आहे.

samsung_safty_truck

अनेकदा अवजड वाहनांना ओव्हरटेक करतांना मागील बाजूच्या वाहनधारकांना अडचणीचे ठरत असते. अशा वेळी समोरच्या बाजूस एखादे वाहन आहे वा नाही? असल्यास किती अंतरावर आहे? ते जवळ येईपर्यंत आपण ओव्हरटेक करू शकू का? आदी प्रश्‍न मागील वाहनातील ड्रायव्हरला पडत असतात. नेमकी हीच समस्या लक्षात घेत सॅमसंग कंपनीने पारदर्शक ट्रक तयार केला आहे.

हा ट्रक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहे. याच्या पुढील बाजूस एक उच्च दर्जाचा वायरलेस कॅमेरा लावलेला असतो. हा कॅमेरा ट्रक समोरच्या दृश्याचे चित्रीकरण करतो. हे चित्रीकरण या ट्रकला मागील बाजूस असणार्‍या डिस्प्लेवर दाखविण्यात येते. हा डिस्प्ले चार स्क्रीनने तयार करण्यात आलेला आहे. यावर अगदी स्पष्टपणे चित्रीकरण दिसते. परिणामी ट्रकच्या समोरील बाजूच जणू येथे दिसते. एका अर्थाने हा ट्रक पारदर्शक बनतो. सॅमसंग कंपनीने या स्वरूपाचा ट्रक तयार केला असून याची यशस्वी चाचणीदेखील घेतली आहे. याला सेप्टी ट्रक असे नाव देण्यात आले आहे. अर्थात प्रत्यक्ष बाजारपेठेत हा ट्रक केव्हा सादर होईल याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here