सेलच्या मैदानावर अमेझॉन व फ्लिपकार्टचा सामना

0
सेलच्या मैदानावर अमेझॉन व फ्लिपकार्टचा सामना, amazon vs flipkart

ग्राहकांना अतिशय आकर्षक ऑफर्स देणार्‍या सेलच्या माध्यमातून आजपासून अमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्ट या देशातील प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांचा सामना सुरू झाला आहे.

अमेझॉन कंपनीने काही दिवसांपूर्वीच १६ जुलैपासून ‘अमेझॉन प्राईम डे’ या सेलची घोषणा केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून प्रतिस्पर्धी फ्लिपकार्ट कंपनीनेही ‘बिग शॉपींग डे’ जाहीर केला आहे. विशेष बाब म्हणजे हा सेलदेखील आजपासून सुरू करण्यात आला आहे. यामुळे या सेलच्या माध्यमातून अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही तुल्यबळ कंपन्या एकमेकांसमोर उभ्या ठाकल्याचे चित्र दिसून आले आहे.

अमेझॉनने अलीकडेच आपल्या ’अमेझॉन नाऊ’ या सेवेला ’प्राईम नाऊ’ या नवीन नावात रूपांतरीत केले आहे. याच्या अंतर्गत ग्राहकाला फक्त दोन तासांमध्ये आपल्या ऑर्डरची डिलीव्हरी मिळणार आहे. नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद या चार महानगरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. प्राईम डे चे औचित्य साधून याचा ग्राहक रात्री १० वाजेपर्यंत ऑर्डर देऊ शकणार आहे. अर्थात त्याला रात्री १२ पर्यंत संबंधीत डिलीव्हरी मिळणार आहे. या सेलमध्ये अमेझॉन प्राईमच्या ग्राहकांनाही विविध प्रॉडक्टवर आकर्षक सवलती मिळत आहेत. ग्राहक अमेझॉन इंडियावर लिस्ट करण्यात आलेल्या सुमारे ४ कोटी प्रॉडक्टमधून आपल्याला हव्या असणार्या वस्तूंची ऑर्डर देऊ शकणार आहे. याशिवाय, अमेझॉन प्राईमच्या ग्राहकांना मोजक्या महानगरांमधील काही मॉल्समध्ये व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीत खरेदी करण्याची सुविधा मिळणार आहे.

दरम्यान, फ्लिपकार्टच्या ‘बिग शॉपींग डे’मध्येही ग्राहकांवर विविध सवलतींचा वर्षाव करण्यात येत आहे. यात दर आठ तासांनी नवनवीन डील्स जाहीर करण्यात येणार आहेत. याच्या दरम्यान ‘रश अवर सेल’देखील सादर करण्यात येणार आहेत. या सेलच्या दरम्यान, एसबीआयच्या कार्डवरून खरेदी करणार्‍या ग्राहकांना विशेष सवलत मिळणार आहे. या सेलमध्ये विविध उपकरणांवर घसघशीत सवलती मिळणार आहेत. यामध्ये विवो, गुगल पिक्सेल, सॅमसंग, असुस आदी कंपन्यांच्या स्मार्टफोन्सचा समावेश असणार आहे. याशिवाय टिव्ही, फ्रीज, वायरलेस हेडफोन्स, पॉवर बँक्स, लॅपटॉप, टॅबलेट, फिटनेस ट्रॅकर, ब्ल्यु-टुथ स्पीकर्स आदींवरही आकर्षक सवलती देण्यात आल्या आहेत.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here