सेल्फी स्पेशल व्हिव्हो वाय६९

0

व्हिव्हो कंपनीने तब्बल १६ मेगापिक्सल्सचा सेल्फी कॅमेरा असणार व्हिव्हो वाय६९ हा स्मार्टफोन १४,९९० रूपये मूल्यात ग्राहकांना उपलब्ध केला आहे.

व्हिव्हो वाय६९ हे मॉडेल शँपेन गोल्ड आणि मॅट ब्लॅक या रंगांच्या पर्यायांमध्ये १ सप्टेंबरपासून अमेझॉन, फ्लिपकार्टसह ऑफलाईन पध्दतीत भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्यात येणार आहे. शीर्षकात नमूद असल्यानुसार यात तब्बल १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यात सॅमसंगचा एस५के३पी३एसटी हा सेन्सर देण्यात आला आहे. याशिवाय यात एफ/२.० अपार्चर व मूनलाईट ग्लो लाईट हे फिचर्स असतील. या कॅमेर्‍यात बोके इफेक्ट, ग्रुप सेल्फी तसेच लाईव्ह फोटो हे विशेष फिचर्सदेखील असतील. या सर्वांच्या मदतीने अर्थातच अतिशय दर्जेदार सेल्फी घेता येतील असे कंपनीने नमूद केले आहे. तर यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा असून यात एफ/२.२ अपार्चर, ड्युअल फ्लॅश आदी फिचर्स असतील.

उर्वरित फिचर्सचा विचार करता व्हिव्हो वाय६९ या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजेच १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३चे संरक्षक आवरण असेल. ऑक्टा-कोअर मीडियाटेक एमटी६७५० प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलची रॅम तीन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. व्हिव्हो वाय६९ हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर आधारित फनटच ३.२ या ऑपरेटींग प्रणालीवर चालणारे असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here