सोनीचा एक्स्ट्रा बास ब्ल्यु-टुथ हेडफोन

0

सोनी कंपनीने एक्स्ट्रा बास सुविधा असणारा एमडीआर-एक्सबी६५०बीटी हा ब्ल्यु-टुथ हेडफोन ७,९९० रूपयात लॉंच केला आहे.

हा हेडफोन काळा, लाल आणि निळा या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. नावातच नमुद असल्याप्रमाणे यात बास बुस्टर आणि डेडिकेटेड एक्स्ट्रा बास डायफ्राम देण्यात आला आहे. याच्या मदतीने कुणालाही अतिशय उत्तम दर्जाच्या ‘बास इफेक्ट’चा आनंद घेता येतो. हा हेडफोन ब्ल्यु-टुथच्या सहाय्याने विविध उपकरणांशी सहजपणे कनेक्ट होतो. विशेष बाब म्हणजे यात एनएफसी या तंत्रज्ञानाच्या मदतीनेही संगीत ऐकणे शक्य आहे. युएसबीच्या माध्यमातून एकदा चार्ज केल्यानंतर हा हेडफोन तब्बल ३० तासांपर्यंत कार्यरत राहतो.

एमडीआर-एक्सबी६५०बीटी हा हेडफोन २० ते २०,००० हर्टझ या फ्रिक्वन्सीदरम्यानचे ध्वनी सहजगत्या ऐकवू शकतो. तर याची ९५ डेसिबल्स/मिलीवॅट इतकी सेन्सिटीव्हिटी आहे. याचे इयरपॅड हे अतिशय मुलायम आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here