स्नॅपचॅटवर आता ‘मेमरीज’

0
snapchat

स्नॅपचॅट या आपोआप नष्ट होणार्‍या संदेशांसाठी ख्यात असणार्‍या मॅसेंजर अ‍ॅपवर आता छायाचित्रे सेव्ह करण्याची सुविधा देणारे ‘मेमरीज’ हे फिचर आले आहे.

स्नॅपचॅट हे तरूणाईमध्ये तुफान लोकप्रिय असणारे मॅसेंजर अ‍ॅप आहे. यात आपण पाठविलेला संदेश, छायाचित्र वा व्हिडीओ हे समोरच्या व्यक्तीने पाठविल्यानंतर आपोआप नष्ट होत असते. यामुळे संवादातील गोपनीयता राखण्यासाठी स्नॅपचॅट ख्यात झाले आहे. आता मात्र या अ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी त्यांना हवी असणारी छायाचित्रे सेव्ह करण्याची सुविधा प्रदान करणारे ‘मेमरीज’ हे फिचर जाहीर केले आहे. यात या मॅसेंजरवरील कंटेंट हे कुणाही युजरला सेव्ह करता येणार आहे. हे कंटेंट सुरक्षित रहावे म्हणून याला पासवर्ड प्रदान करण्याची सुरक्षादेखील देण्यात आली आहे. या मदतीने सेव्ह केलेले कंटेंट नंतर शेअर करण्याची सुविधादेखील या नवीन फिचरमध्ये देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातून संग्रहीत केलेली छायाचित्रे सर्च करण्याची सुविधाही यात आहे. येत्या काही दिवसांमध्ये क्रमाक्रमाने हे फिचर जगभरातील स्नॅपचॅट युजर्सला मिळेल असे कंपनीने ब्लॉगपोस्टद्वारे जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here