स्नॅपडीलमध्ये २० कोटी डॉलर्सची गुंतवणूक

0

स्नॅपडील या देशातील दुसर्‍या क्रमांकाच्या ई-कॉमर्स कंपनीमध्ये कॅनडातील पेन्शन फंडने २० कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

स्नॅपडीलमध्ये आधी अलीबाबा ग्रुप, फॉक्सकॉन ग्रुप, सॉफ्टबँक आदी प्रमुख कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. गेल्या दिवाळीत ५० कोटी डॉलर्सचे भांडवल जमा करण्यात आले होते. तेव्हा स्नॅपडीलचे एकत्रीत मुल्य ४.८ अब्ज असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता कॅनडातील ‘ओंटारियो टिचर्स पेन्शन फंड’मधून २० कोटी डॉलर्स भांडवल घेण्यात आले आहे. सध्या कंपनीने स्वत:चे मुल्य जाहीर केले नसले तरी ते सहा अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक असावे असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

स्नॅपडीलची स्थापना २०१० साली कुणाल बहल आणि रोहित बन्सल यांनी आपल्या जेस्पर्स इन्फोटेक प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून केली होती. फ्लिपकार्टच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची क्षमता स्नॅपडीलमध्ये असल्याचे आजवर दिसून आले आहे. आज सुमारे पावणेतीन लाख सेलर्स या ऑनलाईन ई-पोर्टलच्या माध्यमातून तब्बल तीन कोटींपेक्षा जास्त वस्तूंची विक्री करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here