स्नॅपडीलवर मिळणार मायक्रोमॅक्स कॅनव्हास ५ एलीट

0
micromax-canvas-sliver-5-q450

मायक्रोमॅक्सने आपला कॅनव्हास ५ एलीट हा स्मार्टफोन ६,४९९ रूपये मुल्यात लाँच केला असून हे मॉडेल ग्राहकांना स्नॅपडील या ई-पोर्टलवरून खरेदी करता येईल.

मायक्रोमॅक्सने आपल्या कॅनव्हास ५ एलीट या स्मार्टफोनमध्ये मेटल बॉडी प्रदान केलेली आहे. यात पाच इंच आकारमानाचा एचडी आयपीएस डिस्प्ले असून याची रॅम दोन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असेल. महत्वाची बाब म्हणजे यात मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने स्टोअरेज वाढविण्याची सुविधा दिलेली नाही. यातील कॅमेरे हे ८ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. ड्युअल सीमकार्डची सुविधा असणार्‍या या मॉडेलमध्ये फोर-जी नेटवर्क सपोर्ट असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here