स्नॅपडील गोल्डची घोषणा

0
snapdeal_gold

स्नॅपडील या ऑनलाईन ई-पोर्टलने आपल्या ग्राहकांना वेगवान आणि अत्युच्च दर्जाची सेवा प्रदान करण्यासाठी ‘स्नॅपडील गोल्ड’ ही योजना सुरू केली आहे.

अमेझॉन इंडियाने अलीकडेच ‘अमेझॉन प्राईम’ या नावाने सेवा सुरू केली होती. यात ग्राहकांना मोफत शिपींगसह तात्काळ डिलीव्हरी करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यानंतर फ्लिपकार्टनेही तातडीने ‘फ्लिपकार्ट प्लस’ योजना सुरू केली. या दोन्ही योजनांमध्ये कुणीही ग्राहक वार्षिक वर्गणी भरून सदस्य बनू शकतो. यानंतर त्याला या योजनेचे विविध लाभ मिळू शकतात. या पार्श्‍वभुमिवर आपल्या प्रतिस्पर्ध्यांशी टक्कर घेतांना स्नॅपडीलने ग्राहकांसाठी ‘स्नॅपडील गोल्ड’ची घोषणा केली आहे. अर्थात अमेझॉन आणि फ्लिपकार्टप्रमाणे यासाठी कोणतीही आकारणी करण्यात येणार नाही. म्हणजे ही सेवा अगदी मोफत असेल. मात्र यात ऑनलाईन पेमेंट करणार्‍यांना लाभ मिळणार असून ‘कॅश ऑन डिलीव्हरी’च्या ग्राहकांना ती लागू करण्यात आलेली नाही. या सेवेच्या अंतर्गत मोफत ‘नेक्स्ट डे डिलिव्हरी’, मोफत शिपींग, विस्तारीत ग्राहक संरक्षण आदींचा समावेश आहे. स्नॅपडीलच्या ‘फुलफिल्ड प्रॉडक्ट’साठी ही सेवा लागू राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here