स्वयंचलीत बसचा ताफा लवकरच रस्त्यांवर धावणार

0
स्वयंचलीत बस,driverless bus

चीनी कंपनी बायडूने स्वयंचलीत बस तयार केली असून याचा पहिला ताफा प्रत्यक्षात लवकरच रस्त्यावर दिसणार असून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

स्वयंचलीत अर्थात ड्रायव्हरलेस वाहनांची निर्मिती गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. याच्या चाचणीमध्ये गुगलने बाजी मारली आहे. यासाठी त्यांनी वेमो या नावाने नवीन उपकंपनी देखील स्थापन केली आहे. गुगलची ड्रायव्हरलेस कार कोणत्याही क्षणाला रस्त्यावर दाखल होऊ शकते. दरम्यान, गुगलसोबत अन्य कंपन्यांनीही यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यात काही ऑटोमोबाईल उत्पादकांसह टेक कंपन्यांचाही समावेश आहे. यामध्ये बायडू या दिग्गज चीनी कंपनीने आघाडी घेतली आहे. बायडूने आता ड्रायव्हरविना चालणार्‍या बसची निर्मिती केली असून याची यशस्वी चाचणीदेखील घेण्यात आली आहे.

बायडूचे सीईओ रॉबीन ली यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. आपल्या शिआमेन या शहरातील कारखान्यातून पहिल्या १०० स्वयंचलीत वाहनांचा ताफा लवकरच रस्त्यावर दिसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. १४ आसनांची क्षमता असणार्‍या या मिनीबसला ओपोलोंग असे नाव देण्यात आलेले आहे. या बसमध्ये स्टीअरिंग व्हील, ड्रायव्हरची सीट, अ‍ॅक्सीलेटर, ब्रेक आदी कोणताही घटक नाही. यासाठी बायडूने किंग लोंग या चीनी वाहन उत्पादक कंपनीशी सहकार्याचा करार केला आहे. या १०० स्वयंचलीत बसेसच्या ताफ्यातील वाहने ही बीजींगसह चीनच्या विविध शहरांमधील अगदी गजबजलेल्या रस्त्यावरून धावणार असून यासाठी आवश्यक असणार्‍या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आल्याचेही रॉबीन ली यांनी नमूद केले आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here