होंडा डिओ डिलक्स स्कूटर दाखल

0

होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया लिमिटेड या कंपनीने डिओ डिलक्स ही नवीन स्कूटर भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

होंडा डिओ डिलक्स या मॉडेलचे एक्स-शोरूम मूल्य ५३,२९२ रूपये इतके असून कंपनीच्या देशभरातील डीलर्सकडे हे मॉडेल उपलब्ध करण्यात आले आहे. डॅझल यलो मेटॅलिक, मॅट मार्शल ग्रीन मेटॅलिक, पर्ल इग्नेशस ब्लॅक आणि मॅट अ‍ॅक्सीस ग्रे मेटॅलिक या अतिशय आकर्षक रंगाच्या पर्यायांमध्ये हे ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. मूळ मॉडेलपेक्षा यात काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यात फुल अ‍ॅटोमॅटीक डिजीटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देण्यात आले आहे. तसेच यात नवीन एलईडी हेडलँप्सही प्रदान करण्यात आले आहेत. यात होंडा ग्राझिया या मॉडेलप्रमाणे फोर-इन-वन या प्रकारातील इग्नीशन की प्रदान करण्यात आलेली आहे. तर याच्या सीटखाली चार्जींग सॉकेटचा पर्यायदेखील उपलब्ध करण्यात आला आहे.

होंडा डिओ डिलक्स या मॉडेलमधील अन्य फिचर्स हे मूळ मॉडेलनुसारच आहेच. अर्थात यात १०९ सीसी क्षमतेची सिंगल-सिलेंडर इंजिन प्रदान करण्यात आले असून याला स्वयंचलीत गिअर्सशी संलग्न करण्यात आले आहे. याचा अधिकतम वेग ८३ किलोमीटर प्रति-तास असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर याचे मायलेज ६० किलोमीटर प्रति-लिटर इतके असल्याचा दावादेखील करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here