होंडा सीडी ११० ड्रीम डिलक्सचे आगमन

0

होंडा कंपनीने आपली सीडी ११० ड्रीम डिलक्स ही नवीन दुचाकी भारतात ४६,१९७ (दिल्ली: एक्स-शोरूम मुल्य) रूपयांना सादर केली आहे.

काही दिवसांपुर्वीच दिल्ली येथील ‘ऑटो एक्स्पो’मध्ये होंडा सीडी ११० ड्रीम डिलक्सचे अनावरण करण्यात आले होते. आता हे मॉडेल बाजारपेठेत सादर करण्यात आले आहे. ही बाईक चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. ‘सीडी ११० ड्रीम’ या मॉडेलचे हे नवीन व्हेरियंट आहे. यात मुख्यत: ‘सेल्फ स्टार्ट’ हे नवीन फिचर प्रदान करण्यात आले आहे. तर यात आधीच्या मुळ मॉडेलप्रमाणेच ड्रम ब्रेक आणि अलॉय व्हिलची सुविधा दिलेली आहे. यात १०९.१९ सीसी क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे. तर याचे मायलेज ७४ किलोमीटर प्रतिलिटर इतके आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here