होंडा सीबी शाईन नवीन रंगात !

0

होंडा या कंपनीने आपल्या १२५ सीसी या प्रकारात देशात सर्वाधीक विकल्या जाणार्‍या सीबी शाईनला दोन नवीन रंगात उपलब्ध केले आहे. यासोबत या मॉडेलमध्ये किरकोळ बदलही करण्यात आले आहेत.

Honda-CB-shine-new

होंडा कंपनीने २००६ साली सीबी शाईन हे मॉडेल सादर केले होते. १५ सीसी क्षमतेच्या वर्गवारीत देशात सर्वाधीक विकली जाणारी मोटारसायकल म्हणून हे मॉडेल ओळखले जाते. आजवर तब्बल ३० लाखांपेक्षा जास्त हे वाहन विकले गेले आहे. आता या मोटारसायकलचे २०१४ हे नवीन मॉडेल बाजारपेठेत ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. १२५ सीसी क्षमतेच्या या मॉडेलच्या इंजिनात इंजिन थंड करण्याची यंत्रणा लावण्यात आलेली आहे. आजवर ही बाईक ब्लॅक, जेनी ग्रे मेटॅलिक व रिबेल रेड मेटॅलिक या रंगात उपलब्ध होते. आता हे नवीन मॉडेल पर्ल अमेझिंग व्हाईट तसेच ड्युअल टोन रेड अँड ब्लॅक या रंगांमध्येही उपलब्ध करण्यात आले आहे. दिल्लीतील याचे एक्स शोरूम मुल्य ५२,१५३ रूपये इतके आहे. हे वाहन किक ड्रीम स्पोक, सेल्फ ड्रम अलॉय आणि सेल्फ डिस्क अलॉय या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

होंडा कंपनीने नुकतेच सीडी ११० हे आजवरचे सर्वात स्वस्त मॉडेल भारतीय बाजारपेठेत सादर केले होते. एक्स-शोरूम ४१,००० रूपये इतके मुल्य असणारी ही बाईक चांगली लोकप्रिय झाली आहे. या पार्श्‍वभुमीवर सीबी शाईनचे नवीन मॉडेलही ग्राहकांच्या पसंतीस उतरणार असल्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here