२१ मार्चला येणार नवीन आयफोन

0

अॅपल कंपनीने २१ मार्च रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची माहिती आज जाहीर केली असून यात नवीन आयफोन लॉंच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून नवीन आयफोन मॉडेल केव्हा येणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. आजवर अॅपलने प्रत्येक आयफोन हा सप्टेंबर महिन्यातच लॉंच केला होता. मात्र यावर्षी प्रथमच वर्षाच्या पुर्वार्धात नवीन आयफोन येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. यातच आज अॅपल कंपनीने २१ मार्च रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे निमंत्रण प्रसारमाध्यमांना पाठविले. अर्थात या कार्यक्रमात ही कंपनी नवीन प्रॉडक्ट सादर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार या कार्यक्रमात अॅपल कंपनी चार इंच स्क्रीन असणारा आयफोन एसई सादर करू शकते. यात बहुतांश आयफोन ६ एस या मॉडेलचे फिचर्स असणार आहेत. यात १६ आणि ६४ जीबी इनबिल्ट स्टोअरेजचे पर्याय असतील तर यात १६४२ मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. याच कार्यक्रमात अॅपल ९.७ इंच आकारमानाचा डिस्प्ले असणारा आयपॅड प्रो हा टॅबलेट लॉंच करणार असल्याचेही मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here