अ‍ॅडकॉम ल्युमिनोसा वायरलेस हेडसेट सादर

0

अ‍ॅडकॉम कंपनीने ल्युमिनोसा हा वायरलेस कनेक्टीव्हिटी असणारा हेडसेट सादर केला असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.

अ‍ॅडकॉम ल्युमिनोसा हे मॉडेल ओव्हर इयर या प्रकारातील असून ते घडी करण्याजोगे अर्थात फोल्डेबल या प्रकारातील आहे. याचा लूक हा अतिशय आकर्षक असा आहे. ब्ल्यु-टुथ ४.२ तंत्रज्ञानाच्या मदतीने हा हेडसेट स्मार्टफोनसह अन्य उपकरणांना कनेक्ट करता येतो. याची रेंज ही २० मीटर इतकी असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. याशिवाय, यामध्ये ऑक्झ-इन पोर्टदेखील असल्यामुळे याचा वायर्ड या प्रकारात वापर करणेदेखील शक्य आहे. यात अतिशय दर्जेदार असा मायक्रोफोन इन-बिल्ट अवस्थेत प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने कॉल करणे अथवा रिसिव्ह करणे शक्य आहे. तर यावर इन-लाईन या प्रकारातील नियंत्रण प्रणाली देण्यात आली असून याच्या मदतीने विविध फंक्शन्सचे नियंत्रण करता येणार आहे. यामध्ये ४०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल सात तासांचा बॅकअप देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

अ‍ॅडकॉम ल्युमिनोसा या मॉडेलच्या इयर कप्सवर अतिशय आकर्षक असे एलईली देण्यात आलेले आहेत. यात नॉइस कॅन्सलेशन तंत्रज्ञानाचा वापरदेखील करण्यात आला आहे. यात आरामदायी कुशन दिल्यामुळे हा हेडसेट दीर्घ काळापर्यंत वापरूनही युजरला त्रास जाणवत नाही. याचे मूल्य १,४९० रूपये असून याला अमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या संकेतस्थळावरून उपलब्ध करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here