स्मार्टफोनमधील फोटो एडिटींगसाठी अडोबीचे फोटोशॉप कॅमेरा अ‍ॅप

0

अडोबी कंपनीने स्मार्टफोनमधील फोटो एडिटींगसाठी कृत्रीम बुध्दीमत्तेने युक्त असणारे फोटोशॉप कॅमेरा अ‍ॅप सादर करण्याची घोषणा केली आहे.

अडोबीचे नाव येताच फोटोशॉप पासून ते प्रतिमा आणि व्हिडीओ संपादनाशी संबंधीत विविध सॉफ्टवेअर्सची नावे येतात. या अनुषंगाने आता अडोबीने स्मार्टफोनधारकांसाठी फोटोशॉप कॅमेरा अ‍ॅप हे नवीन अ‍ॅप्लीकेशन सादर करण्याची घोषणा केली आहे. यात आर्टीफिशीयल इंटिलेजीयन्स अर्थात कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर करण्यात आलेला आहे. बहुतांश फोटो एडिटींग टुल्समध्ये विविध फिल्टर्स आणि लेन्सेसचा वापर केलेला असतो. अडोबी फोटोशॉप कॅमेरा अ‍ॅपमध्ये यासाठी एआयचा वापर करण्यात आलेला आहे. यात अगदी फोटो काढण्यापूर्वीच युजर्सला विविध पर्याय सुचविण्यात येणार आहेत. यात एआयच्या मदतीने संबंधीत फोटो हा नेमका कोणत्या प्रकारातील आहे हे जाणून घेत त्याला कोणते फिल्टर लावावे याचे रेकमेंडेशन केले जाणार आहे. या अ‍ॅपच्या मदतीने संपादीत केलेल्या प्रतिमांना सोशल मीडियाच्या विविध मंचावरून शेअर करण्याची सुविधादेखील देण्यात आलेली आहे.

या अ‍ॅपसाठी अडोबीनेच विकसित केलेल्या सेन्सेई या एआयवर आधारित प्रणालीचा वापर करण्यात आलेला आहे. हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी प्रयोगात्मक अवस्थेत सादर करण्यात आले आहे. युजरला साईन-अप करण्याची आवश्यकता आहे. साधारणपणे काही महिन्यात हे अ‍ॅप सर्व युजर्ससाठी सादर करण्यात येईल असे कंपनीने जाहीर केले आहे.

पहा : अडोबी फोटोशॉप कॅमेरा अ‍ॅपची कार्यप्रणाली दर्शविणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here