एयरटेल वाय-फाय कॉलींग सेवा देशभरात सुरू

0

एयरटेलने वाय-फाय नेटवर्कवरून कॉलींग करण्याच्या सुविधेचा विस्तार केला असून आता ही सेवा संपूर्ण देशभरात कार्यान्वित करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यापासून एयरटेलने वाय-फाय कॉलींग सेवेची चाचपणी सुरू केली होती. आधी याला निवडक राज्यांमध्ये सुरू करण्यात आले होते. यानंतर आता ही सेवा संपूर्ण देशात सुरू करण्यात आल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आलेली आहे. याच्या अंतर्गत आता कुणीही युजर खासगी अथवा सार्वजनीक (पब्लीक) वाय-फाय नेटवर्कवरून कुणालाही स्थानिक अथवा एसटीडी कॉल करू शकतो. यासाठी एयरटेलच्या युजरला व्हिओएलटीई ऑन केल्यानंत वाय-फाय कॉलींगच्या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. यानंतर ही सेवा कार्यान्वित होणार आहे. कोणत्याही टुजी/थ्रीजी/फोरजी अथवा वाय-फाय नेटवर्कवरील अन्य स्मार्टफोनधारकाला यातून कॉल करता येणार आहे. सद्यस्थितीत १६ कंपन्यांच्या १०० मॉडेल्समध्ये या सेवेचा वापर करता येणार असला तरी लवकरच बहुतांश स्मार्टफोन्समध्ये ही सुविधा मिळणार असल्याचे कंपनीने नमूद केेले आहे.

एयरटेेल वाय-फाय कॉलींगचे फिचर हे अतिशय महत्वपूर्ण असे मानले जात आहे. याच्या माध्यमातून अगदी सुस्पष्ट अशा आवाजात कॉलींग करता येणार आहे. जेथे जीएसएम मोबाईल नेटवर्क नसेल अशा ठिकाणी आणि जिथे मोबाईलची रेंज मिळत नाही अशा ठिकाणी वाय-फाय कॉलींग सेवा वरदान ठरणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे एयरटेलच्या युजर्सला यासाठी कोणत्याही अतिरिक्त शुल्काचा भुर्दंड सहन करावा लागणार नाही. अर्थात, ही सेवा युजर्ससाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करण्यात आलेली आहे. या माध्यमातून एयरटेल ही वाय-फाय कॉलींग उपलब्ध करणारी पहिली कंपनी बनली आहे. यानंतर जिओनेही अलीकडेच वाय-फाय नेटवर्कवरून ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलींगची सुविधा जाहीर केली आहे. अर्थात, आता या क्षेत्रातही चुरशीची स्पर्धा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here