अलेक्झा आता हिंदीतून बोलणार !

0

अमेझॉनने आपल्या अलेक्झा या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटला आता हिंदी भाषेचा सपोर्ट प्रदान केला असून आता मराठीचा क्रमांक कधी लागणार याची उत्सुकता लागली आहे.

व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनू पाहत आहेत. गुगल असिस्टंट, अ‍ॅपलचा सिरी, अमेझॉनचा अलेक्झा आदी असिस्टंटचा वापर स्मार्टफोनसह विविध उपकरणांमध्ये होत आहे. यातील अमेझॉनचा अलेक्झा हा असिस्टंट मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. विशेष करून याला स्मार्ट स्पीकर आणि स्मार्ट डिस्प्लेसोबत संलग्न करण्यात आल्यामुळे युजर्समध्ये याची लोकप्रियता वाढीस लागली आहे. भारतीय ग्राहकही याचा वापर करू लागले आहेत. भारतीय युजर्ससाठी विविध कंपन्यांनी स्थानिक भाषांचा सपोर्ट देण्यास सुरूवात केली आहे.

गुगल असिस्टंटने सुमारे एक वर्षाआधीच हिंदी भाषेचा सपोर्ट दिला आहे. आता अमेझॉनच्या अलेक्झालाही हिंदीचा सपोर्ट दिलेला आहे. यामुळे आता युजर्स हिंदी भाषेतून ध्वनी आज्ञावली अर्थात व्हाईस कमांड देऊन विविध फंक्शन्सचा वापर करू शकणार आहेत. यात ”अलेक्झा बॉलीवुडके गाने सुनाओ” अशा प्रकारच्या विविध कमांडचा वापर करता येणार आहे. यात अलेक्झाच्या विविध स्कील्सचाही समावेश आहे. अर्थातच यामुळे अलेक्झाची लोकप्रियता वाढीस लागणार आहे. दरम्यान, आता अलेक्झावर मराठीचा सपोर्ट केव्हा येणार ? याची उत्सुकता लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here