गुगलचा अ‍ॅलो मॅसेंजर काळाच्या पडद्याआड

0
google-allo-app-for-android

गुगलच्या अ‍ॅलो या मॅसेंजरची सेवा आता बंद करण्यात आली असून या माध्यमातून हे अ‍ॅप आता काळाच्या पडद्याआड गेले आहे.

गुगलने २०१६ साली आपल्या आय/ओ परिषदेत अ‍ॅलो मॅसेंजर आणि ड्युओ व्हिडीओ कॉलींग अ‍ॅपची घोषणा केली होती. यानंतर या दोन्ही सेवा जगभरातील युजर्ससाठी सादर करण्यात आल्या होत्या. यापैकी ड्युओला बर्‍यापैकी प्रतिसाद लाभला असला तरी अ‍ॅलो मात्र युजर्सच्या पसंतीस उतरले नव्हते. बरेच प्रयत्न करूनदेखील याच्या प्रगतीचा आलेख वाढत नव्हता. यामुळे गुगलने डिसेंबर २०१८ मध्ये अ‍ॅलो हे मॅसेंजर बंद करण्याची घोषणा केली होती. यानुसार १२ मार्च २०१९ पासून अ‍ॅलो बंद करण्यात आले आहे. अ‍ॅलोचे अँड्रॉइड व आयओएस अ‍ॅप तसेच वेब या तिन्ही प्रकारातील सेवा आता कायमच्या बंद करण्यात आलेल्या आहेत. तत्पूर्वी गुगलने अ‍ॅलोच्या युजर्सला आपली चॅट हिस्ट्री आणि मॅसेजेस डाऊनलोड करण्याची सुविधा प्रदान केली होती.

गुगलने अनेक प्रयत्न करूनही व्हाटसअ‍ॅपला टक्कर देता आलेली नाही. आता अ‍ॅलो काळाच्या पडद्याआड गेले असतांना गुगलचा हा प्रयत्नदेखील फसल्याचे स्पष्ट झाले आहे. अ‍ॅलो बंद झाल्यानंतर आता गुगलकडे हँगाऊट चॅट, मीट, अँड्रॉइड मॅसेजेस आणि ड्युओ या चार मॅसेजींग सेवा उरल्या आहेत. या सर्वांवर आता गुगल लक्ष देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील अँड्रॉईड मॅसेजेस आणि ड्युओ हे ग्राहककेंद्रीत तर हँगाऊट चॅट व मीट या सेवा कार्पोरेट क्षेत्रांसाठी उपयुक्त असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. यामुळे गुगल याच पध्दतीत आपल्या या चारही सेवांना प्रमोट करणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here