अमेझॉन इको ऑटो भारतात सादर

0

अमेझॉनने अलेक्झा या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटने युक्त असणारे इको ऑटो हे उपकरण भारतीय बाजारपेठेत सादर केले आहे.

अमेझॉन इको ऑटो या उपकरणाचे मूल्य ४,९९९ रूपये असून याची अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून विक्रीपूर्व नोंदणी सुरू करण्यात आली आहे. नावातच नमूद असल्यानुसार हे उपकरण खास करून चारचाकी वाहनांसाठी विकसित करण्यात आलेले आहे. हा खास चारचाकींसाठी विकसित करण्यात आलेला स्मार्ट स्पीकर आहे. हे उपकरण आकाराने अतिशय आटोपशीर असून याला कारच्या डॅशबोर्डवर यासोबत देण्यात आलेल्या माऊंटच्या मदतीने जोडता येणार आहे. यात अमेझॉनचा अलेक्झा हा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट प्रदान करण्यात आलेला आहे. हे उपकरण संबंधीत युजरच्या स्मार्टफोनला कारमधील साऊंड सिस्टीमसोबत कनेक्ट करण्यास सक्षम आहे. यातील विविध फंक्शन्सचा वापर हा अमेझॉनच्या अलेक्झा या व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंटच्या मदतीने करता येणार आहे. अर्थात, कुणीही युजर ध्वनी आज्ञावलीच्या (व्हाईस कमांड) मदतीने त्याला हवे असणारे फंक्शन्स वापरू शकतो.

अमेझॉन इको ऑटो या उपकरणात अतिशय संवेदनशील असे आठ मायक्रोफोन देण्यात आलेले आहेत. ते कारच्या इंजिनचा आवाज, बाहेरील वाहतुकीचा ध्वनी, कारमधील साऊंड सिस्टीम व एयर कंडीशनरचा आवाज येत असतांनाही युजरच्या व्हाईस कमांडला अचूक ओळखू शकणार असल्याचा दावा अमेझॉनने केला आहे. याचा वापर करून संगीत ऐकणे, त्यातील ट्रॅक पुढे-मागे करून ध्वनी कमी-जास्त करणे आदींसह बातम्या ऐकणे, दरवाजे बंद करणे, नजीकच्या पेट्रोल वा डिझेल पंपची माहिती मिळवणे आदी कामे पार पाडणे शक्य आहे. हे उपकरण गुगल मॅप्स, अ‍ॅपल मॅप्स, अ‍ॅपल म्युझिक आदींसह अन्य थर्ड पार्टी अ‍ॅप्ससोबत वापरता येणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे अमेझॉन म्युझिक, स्पॉटीफाय, पंडोरा आदी म्युझिक स्ट्रीमिंग सेवांचाही याला सपोर्ट दिलेला आहे. तथापि, याला अ‍ॅपल कार प्ले अथवा अँड्रॉइड ऑटो या प्रणालींचा सपोर्ट देण्यात आलेला नाही. यामुळे युजरला हे उपकरण वापरण्यासाठी आपल्या स्मार्टफोनवर अवलंबून रहावे लागणार आहे. यातच सर्वच फोनमध्ये याच सपोर्ट नसल्याचा थोडा अडसर होऊ शकतो. तथापि, येत्या कालखंडात याला सर्व स्मार्टफोन्सचा सपोर्ट मिळेल असे अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here